सफाई कर्मचाऱ्यांची बुधवारची सुट्टी रद्द ,एनडीएमजेने दिला आंदोलनाचा इशारा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी नगरपरिषदेने सफाई कर्मचाऱ्यांची दर बुधवारी असणारी साप्ताहिक सुट्टी जून २०२५ पासून रद्द केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एनडीएमजे) या संघटनेने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.5000सफाई कर्मचारी बार्शी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतात. सणासुदीच्या सुट्ट्यांमध्येही ते आपले कर्तव्य बजावतात. शहराला स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. असे असताना, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली साप्ताहिक सुट्टी कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता रद्द करण्यात आली आहे. एनडीएमजेने आपल्या निवेदनात म्हटले की, “सुट्टी रद्द करण्याचा कोणताही लिखित आदेश किंवा कारण देण्यात आलेले नाही. हा कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे.”

आज, सफाई कर्मचारी दिनी, एनडीएमजे तालुका अध्यक्ष सनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यात सुट्टी पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष ॲड प्रसन्नजीत नाईकनवरे, तालुका सचिव सुर्या मस्के, खजिनदार रोहित लोंढे, विधी सल्लागार ॲड. स्वप्नील खंडागळे, ॲड.मिलिंद बनसोडे, कार्याध्यक्ष अमित गायकवाड, संघटक समाधान चौधरी, प्रसिद्धी प्रमुख लखन बनसोडे, शहर उपाध्यक्ष धीरज भोसले, शहर सचिव सुमीत खुरंगुळे, शहर खजिनदार मिलिंद भालेराव, शहर कार्याध्यक्ष अजय वाघमारे, शहर विधी सल्लागार ॲड. सचिन किरतकुहवे, ॲड. अक्षय बिडबाग, शहर समन्वयक प्रमोद गायकवाड, शहर संघटक श्रीकांत कांबळे, शहर प्रसिद्धी प्रमुख सचिन लोकरे आणि सदस्य कपील बोकेफोडे, धनंजय बोकेफोडे, जय शिरामे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या