जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सांगली : सांगली जिल्ह्यातून जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे इयत्ता 6 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता 80 जागा भरण्यात येणार आहेत. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास दि. 13 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीमध्ये भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे प्राचार्य ए. एस. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत घेतली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.navodaya.gov.in/https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. पात्र उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असावा. ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्य रित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र (Photo), विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकांकडून प्रतिहस्ताक्षरित केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरुपात 10kb-100kb प्रमाणात) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्यांचा जन्म हा 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान झालेला असावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या