श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० : ०० वाजता वधू – वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. पालकांनो विवाह एक ज्वलंत सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. मुला – मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अवाजवी अपेक्षा, जाती – पोटजाती, जवळच – दूरच, उच्च शिक्षण, सरकारी नोकरी, चांगला पगार, बंगला इ. पालकांच्या अपेक्षा आणि स्थळ शोधण्यासाठी वेळेचा अभाव यामुळे मनपसंत जीवनसाथी लवकर मिळत नाही. मुला – मुलींचे लग्न ठरत नाहीत. पर्यायाने लग्नाचे वय वाढत चाललेले आहेत. 500000यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याची नितांत गरज आहे. परिचय मेळाव्या दिवशी अनेक सुंदर, सुसंस्कृत, शिक्षित – उच्च शिक्षित, मनपसंत स्थळांचा परिचय समोरासमोर होत असतो. एकमेकांना पाहता येते. म्हणून दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी अंतर्गत मातोश्री रमाई वधु – वर सुचक केंद्र श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी यांच्या वतीने, परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता संबंधित पालकांनी २० ऑगस्ट २०२५ अखेर रु.१००/- फी भरून ट्रस्ट तर्फे चहा व भोजनाच्या नियोजना करिता आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

विवाह करु इच्छिणाऱ्या तरुण – तरुणी आणि त्यांच्या पालकांचा हा मेळावा असल्याने या मेळाव्यास संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहून कुटुंबाचा व मुला / मुलीचा परिचय करून देऊन जोडीदारा बाबत योग्य अपेक्षा सांगने अपेक्षित आहे.

परिचय मेळाव्यास येताना मुलाचा / मुलीचा पुर्णाकृती फोटो, शैक्षणिक पात्रतेच्या, उद्योग – व्यवसाय किंवा नौकरी संबंधित सर्व कागदपत्रांच्या फोटो कॉपी व बायोडाटा सोबत आणणे आवश्यक आहे. विवाह एक सामाजिक समस्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी संबंधित सर्व गरजूंनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा.5000संयोजक – मधुकर पालखे ९४०५७१८१३२, नागनाथ सोनवणे ९२७१७२६१८६, भीमराव कदम ९१५६२०१५३०, विष्णू कांबळे ९४०३९४८३५९

पत्ता :- मातोश्री रमाई वधु-वर सुचक केंद्र,श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी, चांडक पेट्रोल पंपाच्या मागे कुर्डूवाडी रोड, बार्शी, जिल्हा – सोलापूर..

( टीप : सदर दिवशी किंवा तत्पूर्वी पाऊस पडला असल्यास सदर परिचय मेळावा ऑक्सिजन पार्क समोर कासारवाडी रोड,बार्शी येथे घेण्यात येईल याची नोंद घ्यावी )

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या