शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही : आनंद काशीद
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये दिलेलं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा ते पूर्ण करण्यासाठी मा मंत्री बच्चुभाऊ कडू हे मागील काही दिवसापूर्वी अमर उपोषणाला बसले होते.
त्यावेळी सरकारतर्फे आश्वासन देण्यात आले की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू आणि शेतकऱ्यांचा उतारा देखील कोरा करू परंतु पावसाळ्या अधिवेशन संपलं तरी कोणतही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत शांत बसणार नाही. असे आनंद काशीद म्हणाले त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता विधानभवनामध्ये रमी खेळणारे कृषी मंत्री मात्र या महाराष्ट्राने बघितले अशा या शेतकरी प्रश्नावरती गंभीर नसणाऱ्या सरकारला येणाऱ्या काळात धडा शिकवायची वेळ येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील आनंद कशीद त्यांनी केले.
रस्ता रोको आंदोलन वैराग माढा रोडवर यावली फाट्यावर या ठिकाणी करण्यात आले.या आंदोलनासाठी उंडेगाव, सुर्डी, इर्ले- वाडी, यावली या गावचे शेतकरी उपस्थित होते. आंदोलन वेळी उपस्थित राहिलेले शेतकरी बांधव ईश्वर पोकळे काशिनाथ शिंदे परमेश्वर पासले परमेश्वर जगदाळे परमेश्वर काकडे आंना अवताडे प्रदीप उकरंडे किशोर उकरंडे अभिजीत उकरंडे नामदेव खरात बापू चव्हाण यशवंत सुरवसे आबा गावडे शरद कदम मोना काकडे गणेश लोखंडे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक




