मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी येथे महासंकल्प रक्तदान शिबिरात 1015 रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टी बार्शी शहर आणि तालुका यांच्या वतीने ‘महासंकल्प रक्तदान शिबिरा’चे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी 1015 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे रक्ताचा तुटवडा असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदान करून केले. त्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिबिराला भाजपा सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत आणि भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा रोहिनीताई तडवळकर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
“रक्तदान हेच खरे जीवनदान” या संकल्पनेतून प्रेरित या शिबिरात स्थानिक रुग्णालये आणि भगवंत रक्त पेढीच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा बार्शी शहर व तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या शिबिरात रक्तदानासोबतच नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व आणि आरोग्य जागरूकतेबाबत माहिती देण्यात आली.
या विक्रमी सहभागाबद्दल सर्व रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे शतशः आभार मानत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “हा उपक्रम समाजसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना आहे,” असे त्यांनी सांगितले. बार्शीतील या महासंकल्प रक्तदान शिबिराने सामाजिक एकजुटीचे आणि मानवतेचे दर्शन घडवले आहे.




