सरकार मुजोर; त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे – कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बार्शी मध्ये 21 जुलै २०२५ वार सोमवार रोजी भगवंत मैदान बार्शी येथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेहला. यावेळी मोर्चेकरांनी श्री. शिवछत्रपती यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या या मोर्चात शिस्तबद्ध पद्धतीने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
मोर्चात असेल कचेरीवर जात असते ते सभेत रूपांतर झाले यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे , रामराजे पवार, हरी पवार , लहू आगलावे, लक्ष्मण घाडगे , सतीश पाटील, यांची भाषणे झाले सभेचे संचलन कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी यांनी केले. यावेळी अक्कलकोट येथील संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांना तसेच कृषिमंत्री रम्मी प्रकरणात लातूर येथील विजय घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा मोर्चेकरांनी निषेध नोंदवला.
सभेला मार्गदर्शन करताना कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले “सरकार मुजोर आहे; त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे निर्माण झाले आहेत, मार्केट कमिटी पॉलिसी सरकार बदलत आहे; व हमीभावाच्या संदर्भात फसवणूक करण्याचे सरकारचे धोरण आहे, शेतकऱ्यांचा 48 कोटी रुपयांचा थकीत पिक विमा देणे गरजेचे झाले आहे, इमानदार शेतकऱ्यांपुढे हे बेईमानीचे सरकार सत्तेवर बसले आहे, ग्रामीण भागात एसटीला रस्ता नीट नाही आणि हे शक्तिपीठ महामार्ग बनवायला निघालेले आहेत , पैसेवाल्या वर्गासाठी हा मार्ग उपयोगाचा आहे; 87 हजार कोटी खर्चून शेतकरी वर्गाला उध्वस्त करून टाकण्याचे धोरण शक्तिपीठ महामार्ग मागे आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे “विंचू देव्हाऱ्यावर आला तर; त्याला देव पूजा न आवडे, तेथे पैजाराचे काम” याप्रमाणे संविधानावर बसलेल्या या विंचूवाची हकालपट्टी करण्याची काम पुढील काळात शेतकरी करतील आणि आपल्या न्याय मिळवून घेतील.”
तहसीलदार एफ. आर. शेख यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले; स्थानिकपातळीवरील प्रश्नांसंदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले; मोर्चाच्या मागण्यांमध्ये , उत्पादन खर्चावर आधारित पिकांना हमीभाव द्या , शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा व सातबारा कोरा करा, बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करा व सावकारशाहीतून सुटका करा , गेल्या वर्षीची पीक विम्याची थकबाकी त्वरीत द्या , एक रुपया विमा योजना चालू राहू द्या, स्पिंकलर व सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे मोफत द्या , उजनी धरणातून बार्शी तालुक्याला शेतीसाठी दोन टीएमसी पाणी द्या, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, सुरत चेन्नई संपादित केलेल्या जमिनीला वाढीव दरवाढ द्या, मागेल त्याला वीज कनेक्शन व वीज पुरवठा करा , ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करा , वाहतुकीची एसटी ची सोय तातडीने करा, संतनाथ गृहनिर्माण सोसायटी वैराग कडून फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीवरील जप्ती त्वरित थांबवा, लबाडांवर कारवाई करा, शाळा , आरोग्य केंद्र सुसज्ज करा, योग्य दरात खते बी बियाणे अवजारे यांचा पुरवठा करा, बनावट खते व बी बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई द्या, रेशन घेतल्यानंतर पावती द्या, ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था निर्माण करा स्त्रियांचे संरक्षण करून भयग्रस्त वातावरण दूर करा, स्मार्ट मीटर लावणे बंद करा.
यावेळी कॉ. प्रविण मस्तुद , अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, आनंद गुरव, चंद्रकांत मंडलिक , बंकुरे नाना, .राहुल ठोंबरे, प्रमिला शिंदे, सुरेश कुंभार, सतीश गायकवाड, शितल करडे, शुभांगी दुधाळ, सुनीता निकम, अशा घळके आदी शेतकरी व कामगार उपस्थित होते.




