कुटुंब नियोजन क्षेत्रात उकृष्ट कार्य करणारे ६५ कर्मचारी सन्मानीत
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२१ : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कडून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त (दि.११) सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात कुटुंब नियोजन क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ६५ अधिकारी व कर्मचारी व संस्थाचा गौरव चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ.प्रशांत बढे, आरएमओ डॉ. सारिका लांडगे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती विद्या सानप, वैद्यकीय अधिकारी साथरोग डॉ.शेख शकिल अहमद, तसेच जिल्ह्यातील जिल्हा आयुष अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय सर्व तालुका आरोग्य अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाच सर्जन, उप जिल्हा रुग्णालय एक, ग्रामीण रुग्णालय तीन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य सेविका, तीन आरोग्य सेवक तसेच पीपीआयसीयुडी, उप जिल्हा रुग्णालय एक, ग्रामीण रुग्णालय तीन, प्राथमिक आरोग्य केंद्र तीन, वैद्यकीय अधिकारी तीन, आरोग्य सहायिका तीन, आरोग्य सेविका चार, आशा एक, प्रोत्साहानपर आठ असे एकूण पासष्ट अधिकारी, कर्मचारी व आरोग्य संस्थाचा या वेळी प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभया धानोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी बी.एस.थोरात, श्रीमती प्रमीला पारीसे, शशिकांत ससाणे, रामेश्वर मुळे, आर.एम.शेख, नरेंद्र बावणथडे, चंदन गणोरे, श्रीमती शारदा कांबळे, शिवम देशमुख,प्रज्वल मुळे, श्रीमती अर्चना भारती, लतीफ इ. परिश्रम घेतले.




