भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड : भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण परिक्षेत्राच्या मुख्य अभियंता सुषमा गायकवाड, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य आणि अत्याधुनिक सोयींनी युक्त इमारतीबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “या इमारतीमुळे स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे व सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. ही इमारत ही केवळ एक शासकीय सुविधा नसून, पनवेल तालुक्याच्या शासकीय प्रगतीचा नवा टप्पा ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.




