आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ७ कोटी, ११ लाख, ७७ हजार, ०४६ रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील ६ कोटी, ५५ लाख, ७९ हजार, ०२४ रुपये किंमतीची विकास कामे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १७ मधील ५५ लाख, ९८ हजार, ०२३ रुपये किंमतीची विकासकामे अशा एकूण ७ कोटी, ११ लाख, ७७ हजार, ०४६ रुपये किंमतीच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास आप्पा रेनके, भारत पवार, पक्षनेते विजय नाना राऊत, नगरसेविका सौ. पुष्पाताई वाघमारे, सौ. भागिरथीताई त्रिंबके, संतोष भैय्या बारंगुळे, स्थानिक नागरिक बंधू-भगिनीं उपस्थित होते.