संजय गायकवाड प्रतिष्ठाणने केली गरीबांची दिवाळी गोड

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवाळीचे औचित्य साधुन संजय गायकवाड प्रतिष्ठाणच्या वतीने गोर गरीब कुटुंबांना मोफत साखर वाटप करण्यात आले. या वेळी आ.राजेंद्र राऊत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अविनाश गायकवाड, नगरसेवक संदेश काकडे, प्रसन्नजीत नाईकनवरे, आप्पा कांबळे, सनी गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी आ.राजेंद्र राऊत यांनी संजय गायकवाड प्रतिष्ठाणच्या कामाचे कौतुक केले.