हरित धाराशिव अभियान , परंडा नगर परिषदेच्या वतीने परंडा शहरात 51 हजार झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण
B1न्यूज मराठी नेटवर्क
परंडा : महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत एका दिवसात १५ लक्ष वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा नगरपरिषदेने शहरात ५१ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता.
दि.१९. जुलै २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता जामगाव रोड येथील हजरत खाजा बद्रोद्दिन दर्गा परिसरात घन वन पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर जि.प सभापती दता आण्णा साळूंके , तहसीदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी रविंद्र चकोर, जि.प उपमुख्याधिकारी मनोज राऊत , नगरसेवक वाजिद दखनी , सर्फराज कुरेशी , रत्नकांत शिंदे, जावेद पठाण, संजय घाडगे, यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांची पदाधिकारी, प्रतिशिष्ठ नागरिक, यांच्यासह सर्व स्तरावरील नागरीक उपस्थित होते.
या अभियानाच्या यशस्वीते करिता मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्या सह परंडा नगर परिषदेचे कर्मचारी विविध सामाजिक संस्था ,शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी बावची विद्यालय रागे . शिंदे महाविद्यालय, कल्याणसागर विद्यालय, जिजामाता विद्यालय, जि.प शाळा , जिप उर्दू शाळा, महात्मा गांधी विद्यालय, क्रांती करिअर ॲकॅडमी, चे विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच माहिला बचतगट व त्यांचे पदाधिकारी शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष,शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक यानी उपक्रमात सह्भाग घेतला. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




