दिव्यांगांसाठी वैयक्तिक स्वरुपाच्या योजना; लाभ घेण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : जिल्हा समाज कल्याण विभाग, परभणी अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नातून 5 टक्के दिव्यांग कल्याणार्थ राखीव निधी व अखर्चित दिव्यांग कल्याण निधीतून परभणी जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या दिव्यांगांसाठी खालीलप्रमाणे वैयक्तीक स्वरुपाच्या योजना राबविण्यात येत आहेत, या योजनांचा दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस.के.भोजने यांनी केले आहे.

1) दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देणे : या योजनेसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे पूर्ण (पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र/टी.सी./आधार/तस्सम), 40% युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराचे रु. 1.00 लाखाच्या मर्यादेत उत्पन्नाचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार/ग्राम पंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पक्के घर नसल्याबाबतचे ग्राम पंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र, स्वतःची जागा असल्या बाबतचा नमुना 8-अ चा पुरावा).

2) दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी स्कुटर वुईथ अडॉप्शन देणे : या योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे (पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र/टी.सी./आधार/तस्सम), 60 टक्केच्यावर युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराचे रु. 1.00 लाखाच्या मर्यादेत उत्पन्नाचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार/ग्राम पंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र, व्यावसायिक स्कुटर स्वतः वापर करणार असल्याबाबतचे ग्राम पंचायत अधिकारी/गट विकास अधिकारी यांनी प्रमाणितत केलेले शपथपत्र. ही योजना केवळ अस्थिव्यंग प्रवर्गातील अधू झालेल्या भागाने (चालण्यास असमर्थ) असलेल्या व दिव्यांगत्वाचे प्रमाण 60 टक्के व व त्याचावर प्रमाण असलेल्या युडीआयडी धारकास लागू राहील.

3) 6 ते 16 वयोगटातील दिव्यांग मुलांच्या पालकांना अर्थसहाय्य देणे : या योजनेसाठी वयोमर्यादा 6 ते 16 वर्षे (पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र/टी.सी./आधार/तस्सम), 40% युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराच्या पालकांचे रु. 1.00 लाखाच्या मर्यादेत उत्पन्नाचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, लाभार्थी व पालक यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड छायांकित प्रत, पालकांचे बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार/ग्राम पंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र) आवश्यक.

4) क्लब फुट, कॉकलियर इंप्लांट इ. शस्त्रक्रिया व श्रवणयंत्र व इतर सहाय्यभुत संसाधने खरेदी करणे : या योजनेसाठी 40 टक्के युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराचे रु.1.00 लाखाच्या मर्यादेत उत्पन्नाचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदार/ग्राम पंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र, शस्त्रक्रिया/श्रवणयंत्र / इतर सहाय्यभूत साधनेबाबतचे तज्ञ डॉक्टरचे प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आवश्यक.

वरील प्रमाणे योजनांचे अर्ज हे संबंधित गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून कार्यालयीन वेळेत विनामुल्य देण्यात येतील. सदर अर्ज हे संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत व अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 22 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सदरील अर्ज हे जिल्हा परिषद, परभणी च्या http://zpparbhani.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दरम्यान, लाभार्थी अर्ज उपलब्ध निधी मर्यादेपेक्षा जास्त प्राप्त झाल्यास पात्र अर्जांमधुन दिव्यांग टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने अंतिम निवड केली जाईल. लाभार्थी निवड झाल्याचे लाभार्थी यांना कळवुन साहित्य खरेदी इ. बाबींचे बीले सादर केल्यावर डीबीटी द्वारे अर्थसहाय्याची रक्कम लाभार्थी यांच्या बँक खात्यावर जमा केल्या जाईल. तरी वरीलप्रमाणे योजनांचे अर्ज इच्छुक दिव्यांग लाभार्थ्यांनी विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांनी केलेले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या