अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनीमिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करणे ही योजना सुरु केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयाकडे दि.30 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.5000या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याची खरेदीचे कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील.

स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रू. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय देय राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रक्कमेच्या 10 टक्के म्हणजे रक्कम रू. 35000/- स्वहिस्सा भरल्यानंतर सदर योजनेचा लाभ घेता येईल.

बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत . बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत तसेच बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व डोमासाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या अगोदर संबंधीत बचत गटाने सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच यापुर्वी सदर योजनेचा लाभघेतला नसलेबाबतचे हमीपत्र आवश्यक आहे. बचत गटाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. मिनी ट्रॅक्टर व ट्रेलर यांची नोंदणी आर.टी.ओ कार्यालयात करणे बंधनकारक आहे.

जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करावा. असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त कल्याण श्रीमती सोनवणे यांनी केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या