भारत पेट्रोलियम आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महानगरपालिका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमांतर्गत BPCL च्या सहकार्याने या मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी BPCL चे टेरिटरी मॅनेजर सौरभ शर्मा, वरिष्ठ प्रबंधक सचिन रावत, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, सह आयुक्त. शशिकांत भोसले सह आयुक्त गिरीष पंडित,आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने आणि एम.सी.एच. न्यूरोसर्जन डॉ. करुणा कबाडी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महानगरपालिकेतील कर्मचारी आणि सर्व सेवकांना आवाहन केले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह (डायबिटीस) आणि रक्तदाब (BP) यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, सकस आहार घ्यावा आणि नियमितपणे शरीराची तपासणी करून घ्यावी. BPCL चे सौरभ शर्मा यांनी सांगितले की, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि शासनाचे सर्वांसाठी सदृढ आरोग्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यात BPCL नेहमीच सहकार्य करेल.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. अशा शिबिरांमधून त्यांनी आपली आरोग्य तपासणी करावी, जेणेकरून त्यांना होणाऱ्या लहान-सहान आजारांची माहिती होऊन स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेता येईल. तसेच उपायुक्त आशिष लोकरे यांनी बदलत्या हवामानामुळे आणि योग्य आहाराच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांवर प्रकाश टाकत आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच, BPCL च्या वतीने प्राथमिक स्वरूपामध्ये क्षयरोग रुग्णांसाठी आरोग्यदायी किटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तन्वंगी जोग यांनी केले, तर BPCL चे फिल्ड सेल्स ऑफिसर विद्याधर हतागळे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिबिरात सहभागी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी:
डॉ. अरुंधती हाराळकर – वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग केंद्र डॉ. तन्वंगी जोग – वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग तज्ञ डॉ. गीता गावडे – वैद्यकीय अधिकारी, ईएनटी,डॉ. वैशाली म्हसवेकर – वैद्यकीय अधिकारी, त्वचारोग डॉ. सुधा फडके – वैद्यकीय अधिकारी (जनरल) आनंद भंडारे – मिश्रक,प्रदीप वेदपाठक – मिश्रक, शंकर मंदोलू – मिश्रक,श्रीमती जाईबाई जाधव – मिडवाईफ,श्रीमती अनुपमा राठोड – मिडवाईफ,श्रीमती व्ही. जी. गायकवाड – मिडवाईफ,शिवलीला धन्ना – लॅब टेक्निशन,बावेश नाईक – लॅब टेक्निशन या शिबिरामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.




