दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : अनेकदा मी नेत्यांना लिहिले पत्र कधीतरी या एकत्र पण नेते एकत्र येत नाहीत.राजकीयदृष्ट्या गटबाजी असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आजही आंबेडकरी जनतेत अभेद्य एकजूट आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही भारतीय दलित पँथर बरखास्त केली. रिपब्लिकन ऐक्यात आलो नसतो तर भारतीय दलित पँथर मोठी राजकीय ताकद असती. आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी सामाजिक पातळीवर तरुणांची एकजूट केली पाहिजे.पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी दलित पँथर सारखी तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. माता रमाबाई आंबेडकर नगर येथे गोळीबारकांडातील शहिदांच्या 28 व्या स्मृतीदिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.

माता रमाबाई आंबेडकर नगर येथे 11 जुलै 1997 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात भीमसैनिकांवर बेछूट पोलिसी गोळीबार करण्यात आला.त्यात माता रमाबाई आंबेडकर नगरातील 10 शहीद झाले. त्यांच्या स्मृतीदिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. मागील 28 वर्षांपासून रिपाइं तर्फे ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात येत असून प्रत्येक वर्षी ना.रामदास आठवले या सभेत उपस्थित राहून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात.

माता रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज पूर्णाकृती पुतळा उभा आहे. यापूर्वी तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा होता. त्या पुतळ्याच्या उद्घाटनास ना.रामदास आठवले हे त्यांच्या लग्नाच्या रात्री उपस्थित राहून पुतळ्याचे उद्घाटन केले होते.त्यावेळी त्यांच्या सोबत नवपरिणीत नववधू सौ. सीमाताई आठवले ही उपस्थित होत्या. याची आठवण ना. रामदास आठवले यांनी सांगितली. माता रमाबाई आंबेडकर नगरशी येथील गल्ली गल्ली शी माझा सबंध आला आहे. अनेक वर्षे मी दलित पँथर च्या चळवळीत रमाबाई कॉलनीत मी येत राहिली अशी आठवण ना.रामदास आठवले यांनी सांगितली. यावेळी सर्व शहीदांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी लोकप्रिय गायक आनंद शिंदे; वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील; सभाध्यक्ष राजा गांगुर्डे; रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; काकासाहेब खंबाळकर; डी एम चव्हाण; श्रीकांत भालेराव; नंदकुमार साठे; शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; विनोद जाधव; अजित रणदिवे; मुश्ताक बाबा; सोहेल शेख; प्रकाश जाधव; अशोक हिरे; काका गांगुर्डे; श्रीधर साळवे; चंद्रशेखर कांबळे;शशिकला मनोहर जाधव; भारती गुरव; उदयराज तोरणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या