राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : दि. 8 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उपसंचालक कृषी (माहिती) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊनदरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धेअंतर्गत खरीप (11) व रब्बी (05) हंगामातील एकूण 16 पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पिक स्पर्धेतील पीके: खरीप पीके:-भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, रब्बी पीके:- ज्वारी, गहू, हरभरा,करडई, जवस (एकूण ०५ पिके) अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख : खरीप हंगाम-मूग व उडीद पिक:- 31 जुलै 2025. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल:- 31 ऑगस्ट 2025. रब्बी हंगाम:ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस :- 31 डिसेंबर 2025.

पिकस्पर्धा विजेते- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसाचे स्वरूप-तालुका पातळी, पहिले बक्षिस रु.5 हजार,दुसरे बक्षिस रु.3 हजार, तिसरे बक्षिस रु.2 हजार. जिल्हा पातळी पहिले बक्षिस रु.10 हजार,दुसरे बक्षिस रु.7 हजार, तिसरे बक्षिस रु.5 हजार. राज्य पातळी पहिले बक्षिस रु

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या