नागपूर-अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे गतीने करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

भविष्यातील लोकसंख्येसाठी वीज मागणीचे आताच नियोजन करा

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : नागपूर व अमरावती जिल्ह्यात उद्योग, निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्याने वाढते आहे. नागपूर व अमरावती मधील विज कामांसाठी मंजूर निधीतील कामे गतीने करा. तसेच सन २०३५ मध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात वीज मागणीची आताच नियोजन करा, दोन्ही जिल्ह्यात वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसेच कोराडी, खापरखेडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,वित्त राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल,ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,आमदार आशिष देशमुख,आमदार मोहन मते,आमदार प्रविण दटके,आमदार चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्ह्‌यामध्ये वीज क्षेत्रातील वाढती मागणी वाढत आहे. विविध पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढली असून विजेची मागणी देखील वाढत आहे. नागपूर व अमरावती जिल्हयासाठी मंजूर वीज क्षेत्रातील विकासासाठी सध्या मंजूर निधीतून कामे पूर्ण करावीत आगामी कालावधीत अजनुही नवीन विविध प्रकल्प वाढत आहेत त्यासाठी ऊर्जा विभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.नागपूर मध्ये ७१३ कोटी तर अमरावती जिल्ह्यात २४२ कोटी रूपयांचे वीज क्षेत्रातील कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे या निधीची तरतूद करण्यात यावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विविध यंत्रणांकडून होणारे भुमिगत केबलचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नवीन होणा-या प्रकल्पांमुळे वीज वितरण क्षेत्रातील वायरिंगचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित केबल डक्ट वापरावेत जेणेकरून वीज वितरण केलेल्या वायरिंग सुरक्षित राहील. सुधारित वीज क्षेत्र योजना,कुसुम-ब योजना,मागेल त्याला सौर कृषीं पंप योजना, ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ व नव्या वीज केंद्रांची उभारणी,नवीन वीज उपकेंद्राची मागणी या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, सचिव श्रीकर परदेशी, पर्यावरण तथा वातावरणीय बदल सचिव जयश्री भोज,महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार,महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी.महाऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक डॉ.कांदबरी बलकवडे यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन ईटनकर यांच्यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या