नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ बार्शी शिक्षण संकुलात विद्यार्थिनी काढली आषाढी एकादशीची दिंडी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आषाढी वारीचे औचित्य साधून प्राथमिक विद्यामंदिर बार्शी बालक मंदिर बार्शी न्यू हायस्कूल बार्शी शाळेत शनिवारी आषाढी एकादशीची दिंडी काढली. यावेळेस सर्व बालकांच्या मुलांच्या अंगावर पांढरे कपडे तसेच मुलींच्या अंगावर साडी परिधान केलेले होते. हातामध्ये वृक्ष संवर्धन संदेश तर काहीजणांच्या हातामध्ये मानवतेचा संदेश होता. बालवाडीचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात अवतरले होते.
या दिंडीचे उद्घाटन प्राथमिकचे मुख्याध्यापक सौ बेळे मॅडम व हायस्कूलचे मुख्याध्यापक उंबरकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेत सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विठ्ठल विठ्ठल जयघोष करत सर्व मुले दिंडीमध्ये सहभागी झालेली होती. वारकरी वेशात टाळ-मृदंग विना पताका डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात विद्यार्थी उत्साहात सहभागी झालेले होते.
जणू काहीही वारी पंढरपुरास मार्गस्थ होत आहे. असा दृश्य दिसून येत होता. ही वारी लोखंड गल्ली म्हणजे टिळक चौक आडवा रस्ता शिवसृष्टी भगवंत मैदान इथपर्यंत काढून या दिंडीचा शाळेत समारोप करण्यात आला. या वारीसाठी सर्व पालकाचा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वारी यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता.




