पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी

0

पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

पंढरपूर दि.(०४) : आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शन रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासन वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून, या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.5000

पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, तसेच पद दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची पाहणी केली.

तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदीर समितीकडून पत्राशेड, दर्शनरांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दर्शनरांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरु केले असुन या अन्नदानाचे वाटपही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

वारकरी भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची घ्यावी अशा सूचनही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. त्याच बरोबर पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालकमंत्री टुव्हीलरवरुन दर्शनरांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली.

यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर प्रशासनाकडून पत्राशेड, दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदीरात भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली. तसेच दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सांगोला तहसिलदार संतोष कणसे उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या