करमुक्त,भयमुक्त दुमदुमणार धाकटी पंढरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग दि ०३ श्री संत माणकोजी बोधले महाराज यात्रा निमित्ताने धामणगाव ता बार्शी येथे आढावा आणि शांतता बैठक पार पडली. पो निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करून सदर यात्रा नियोजनाचा आढावा घेतला.
यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशा संख्येत पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक आणि गावातील जबाबदार नागरिक यांच्या सहकार्याने यात्रेसाठी उपस्थित असणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याचे ठरले.तसेच वेगवेगळ्या गावाहून येणाऱ्या भाविकांचं कोणत्या रस्त्यावरून कुठे आगमन होईल आणि गाड्या कुठे पार्क केल्या जातील याचाही नियोजन आढावा घेण्यात आला. 
सदर यात्रेमध्ये कोणताही गैरप्रकार करून भाविकास त्रास दिल्यास संबंधिताची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी दिला. धामणगावच्या इतिहासात प्रथमच करमुक्त यात्रा करणार असल्याचे कर्तव्यदक्ष सरपंच शिवाजी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
या बैठकीसाठी सरपंच शिवाजी पाटील, पोलीस पाटील गणेश मसाळ, विवेकानंद बोधले हभप हनुमंत महाराज बोधले, केशव जगताप, युवराज पाटील बाबा शिंदे, काकासाहेब कोरके नाना कदम, संतोष ताटे मयुर लुंगसे बापू मसाळ, मंगेश मसाळ, विकास गाडे शहाजी मसाळ महेश बोधले अमोल आलाट देवा झाडकर सागर बोधले तानाजी आलाट राजेंद्र काटकर,,अशोक सुरवसे ग्रामस्था बरोबर किसन कोलते , आकाश पवार, बिबट कल्याणी, आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 


बार्शी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांनी यात्रा ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षेसाठी व वाहतुकीसाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी केले.






