बार्शीचे नागनाथ आडसुळ यांना जीवन गौरव ” पुरस्कार प्रदान

0

B1न्युज मराठी नेटवर्क

सातारा :भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिला जाणार २०२० चा ” जीवन गौरव ” पुरस्काराचे मानकरी बार्शीचे नागनाथ आडसुळ यांना संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते सातारा येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून मनोगत व्यक्त केले.
पुरोगामी विचार धारा आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन सन १९९३ साली श्री.नागनाथ आडसुळ यांनी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक विचारवंत मा. पद्मश्री.लक्ष्मण माने यांच्या (भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन)संघटनेशी नाळ जोडली व त्या माध्यमातून आजतागायत अविरतपणे २८ वर्षे यशस्वी पणे तळागाळातील व मागास तसेच विमुक्त जाती जमाती च्या सर्व सामान्य अठरा पगड लोकांना पर्यंत व निस्वार्थ पणे सेवा केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या