अशोक प्रतिष्ठान कडून आण्णासाहेब ठोकळ यांचा सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील रातंजन येथील जि. प. प्रा. शाळेतील शिक्षक आण्णासाहेब भारत ठोकळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आण्णासाहेब भारत ठोकळ यांचा वाढदिवस पुष्पहार घालून त्याचा सत्कार अशोक प्रतिष्ठानचे ( रातंजन ) अध्यक्ष श्री अशोक नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सिदेश्वर जनार्दन कूरूदं, गौतम नागटिळक, रणजित जाधव, ओंकार कांबळे, बिरु नागटिळक, निलेश गिराम, अरविंद आतकरे , समर्थ पुराणिक , ज्ञानेश्वर चव्हाण ,योगेश शिंगे, गौतम वाघमारे , अभय हिवरे भैरवनाथ चौधरी, स्वप्निल भालशंकर, अशोक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.