योगेश उपळकर यांना जोतिबा सावित्री गुणवंत पुरस्कार प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक योगेश सुभाष उपळकर यांना प्रहार शिक्षक संघटना सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ज्योतिबा – सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवस्मारक सभाग्रह सोलापूर या ठिकाणी देण्यात आला. हा पुरस्कार शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मंगेश चिवटे व सचिन नागटिळक या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी उपळकर परिवार व विद्यालयाचे पर्यवेक्षक सुरेश महामुनी,खंडेराव मदने, सुहास वाघमारे, पुष्कराज पाटील, मनोज मिरगणे, हनुमंत चव्हाण, महेश माने,महेंद्र पाटील, सुरेश डिसले, विजय अनभुले, अतुल नलगे,सिद्धेश्वर शिंदे, जयप्रकाश कोरे ,पंकज ठाकरे , अनिल लटके,प्रशांत बारंगुळे, योगेश पाटील उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल योगेश उपळकर यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. मिराताई यादव , एस.बी. शेळवणे,सर्व कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या