वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बलभीम लोखंडे तर उपाध्यक्षपदी रामदास पवार यांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग ,ता .4 : वैराग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार बलभीम लोखंडे (दै.सकाळ ) तर उपाध्यक्षपदी रामदास पवार (दै . तरुण भारत ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

वैराग (ता .बार्शी ) येथे 3 जानेवारी रोजी शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार भागवत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली वैराग पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या आहेत .

वैराग पत्रकार संघाची अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.सचिव भागवत वाघ (दै . तरुण भारत संवाद ) , खजिनदार राहुल दळवी (दै . दिव्य मराठी ) सहसचिव काशिनाथ क्षिरसागर ( दै . पुढारी ) प्रसिद्धी प्रमुख अण्णासाहेब कुरूलकर (दै . संचार ) संघटक कालिदास देवकते (दै . जनमत ) सदस्य सुजित काकडे (दै . जनसत्य ) आदींची निवड करण्यात आली. यावेळी इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

वैराग ग्रामीण पत्रकार संघाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविणे , सामाजीक उपक्रम राबविणे , आदी विषयावर चर्चा करण्यात आली .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या