जिल्हा कारागृह येथे संविधान दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर, जिल्हा कारागृह, सोलापूर तसेच लाईफ लाईन वेल्फेअर सोसायटी सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने, आज 26 नोंव्हेंबर 2024 रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे प्रतिमेस पुष्प अपर्ण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उदर्शिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव उमेश देवर्षी, कारागृह अधिक्षक तांबोळी, लाईफ लाईन वेल्फेअर सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप तांबोरे, तसेच मुख्य लोकअभिरक्षक श्रीमती. स्नेहल राऊत यांच्या प्रमुख उपस्थित कारागृहातील सर्व कैद्यांना संविधान विषयी व कायदेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लाईफ लाईन वेलफेअर सोसायटीचे सदस्य श्रीमती मृणाल मोरे यांनी कारागृहातील कैद्यांना व्यसनाच्या दुष्परिणाम संदर्भात तसेच व्यसनमुक्ती उपचार आणि आनंदी मानसोपचार आदीबाबत व्याख्यान व परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी समुपदेशक मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध व्यक्तींचा समुह कारागृहात जनजागृती करण्याकरीता उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता लोकअभिरक्षक कार्यालयाचे न्यायरक्षक श्रीमती. देवयानी किणगी तसेच सर्व लोकअभिरक्षक कार्यालयाचे सर्व न्यायरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व सोलापूर कारागृहाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.