जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे 1 ऑक्टोबरला आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राज्यात 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार ज्येष्ठ नागरिकांसाठी मंगळवार दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता द्वारकाधीश मंदिर, जुळे सालापुर यथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी मेळाव्यास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे, यांनी केले आहे.
भारताच्या संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा. तसेच समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याच्या सर्वसमावेशक धोरणानूसार 1 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर व चौधरी फोडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्रीमती सोनवणे यांनी केले आहे.