युगदर्शक आयकॉन पुरस्कार जाहिर17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार वितरण,प्रमुख पाहुणे भास्कर पेरे पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : युगदर्शक प्रतिष्ठाणने समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत असताना सामाजिक बांधीलकीही जपली आहे. गेली दहा वर्षापासून युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युगदर्शक बार्शी आयकॉन व इतर पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा चालू केली आहे. याहीवर्षी आम्ही ही परंपरा कायम करत आहोत व हे पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे.
यावर्षी ‘युगदर्शक बार्शी आयकॉन पुरस्कार, तसेेच राज्यस्तारीय कृषी, अर्थ, हेल्थ, व उद्योग याप्रमाणे पुरस्काराचे वितरण होणार असून हा सोहळा 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठिक 6 वा. तसेच यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे होणार असून या पुरस्काराचे वितरण प्रख्यात वक्ते व आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री व आमदार दिलीप सोपल हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमराजे निंबाळकर, पोलीस उपअधिक्षक जालिंधर नालकुल, तहसिलदार एफ. आर. शेख, बार्शी शहर पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, उद्योजक मनोज देशमुख, ज्येष्ठ संपादक संतोष सुर्यवंशी, उद्योजक महेश यादव, शिवाजी शिक्षण संस्थेचे जयकुमार शितोळे, आण्णासाहेब पेठकर, बप्पा कसबे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराच्या अकराव्या वर्षी युगदर्शक राज्यस्तरीय आयकॉन पुरस्कार पुढील प्रमाणे नामदेव खराडे (उद्योग), समीर लड्डा (अर्थ), डॉ. तेजस्विनी करळे (आरोग्य), ॲड. आबासाहेब पाटील(कृषी), रुपाली नवले(सरपंच) व युगदर्शक बार्शी आयकॉन पुढील प्रमाणे डॉ. अजित आव्हाड (वैद्यकीय), शाकीर शेख (युवा), किरण देशमुख (शिक्षण), दयानंद रेवडकर (क्रिडा), गौतम कांकरीया(सामाजिक) अशा प्रमाणे पुरस्कार जाहिर करण्यात येत असून या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन प्रतिष्ठानचे विश्वस्त नितिन भोसले यांनी केले आहे.
यावेळी संयोजन समिती संजय बारबोले, धैर्यशिल पाटील, विशाल नवले, गणेश शिंदे, अण्णासाहेब वाघमारे, बापू मोरे, अरुण व्हणंकळस पंडित शिंदे,अजित बोरकर, गुरु साखरे, उदय पोतदार, नरेश ठाकूर, श्रीकृष्ण उपळकर, नितीन जाधवर, सचिन गायकवाड, सुरज मुल्ला, सुरज हुंबे, सोमेश भुजबळ, बापु काळे, धनंजय स्वामी आदी उपस्थित होते.