महामानव संस्थेकडून ज्ञानेश्वर भगत यांचा सन्मान, महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : बार्शी तालुक्यातील सासुरे गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर भगत यांची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार कण्यात आला. ज्ञानेश्वर भगत हे गरीब कुटूंबातून पुढे आले आहे. होमगार्ड म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्याच बरोबर खाजगी काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. शांत स्वभाव मनमिळवू व्यक्तिमत्त्व असणारे ज्ञानेश्वर भगत यांची ओळख आहे.
अभिनव सेल्सचे गणेश गोंदकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर भगत यांचा सत्कार श्रीफळ , शाल , पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, सुहास निकाते, सूरज सोपल, प्रफ्फुल बेळंबे, किरण खुरंगळे, अविनाश मदरे, प्रदीप गायकवाड, सुकुमार नागटिळक, इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्ञानेश्वर भगत यांचा सत्कार विविध ठिकाणी जिल्हा परिषद प्रशाला शाळा सासुरे , अभिनव सेल्स वैराग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रस्तावना भैरवनाथ चौधरी तर सूत्रसंचालन आभारप्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.