सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाला विशेष कार्य गौरव सन्मान पत्र पुरस्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इंन्सिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना व चळवळ यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे या हेतूने विषेष कार्य गौरव सन्मान पत्र पुरस्कार सन्मानित करण्यात आले. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. पुरस्कार प्रदान सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह व कलादालन, घोले रोड क्षत्रिय कार्यालय पुणे, घोले रोड, पुणे या ठिकाणी रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य सुधाकरराव जाधवर आहेत. तर प्रमुख अतिथी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश सोनल पाटील, मा. आर. व्ही. जटाळे – ( निवृत्त न्यायाधीश सत्र न्यायालय – अध्यक्ष (पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग), पोलीस उप आयुक्त संदीप सिंग गिल, मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर (जी. एस. टी. आयुक्त), समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव, कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे, संविधान अभ्यासक सुभाष वारे, प्रसिद्ध उद्योजक युवराज ढमाले, पत्रकार श्याम आगरवाल (संपादक दैनिक आज का आनंद) शार्दूल जाधवर, नायब तहसीलदार मदन जोगदंड (राजगुरुनगर) आदी मान्यवर उपस्थित होते.
सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी सर्व महाराष्ट्र मधील माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पुणे येथे कार्यशाळा घेऊन माहिती अधिकार कार्यकर्त्यांची चळवळ उभी केली. संस्थेने महाराष्ट्र मध्ये नाशिक, मुंबई , सांगली व इतर ठिकाणी माहिती अधिकार कायदा व भ्रष्टाचार विरोधी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा याविषयी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन जनजागृती केली.संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व कर्तुत्वाच्या सन्मानार्थ १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त “विषेष कार्य गौरव सन्मान पत्र” प्रदान करुन संस्थेला गौरवण्यात आले. कार्याचा गौरव व सन्मान हे निमित्त आहे. पण या सन्मानामागील भावना, प्रगतीला व कार्याला स्फूर्तीबळ देण्याचीच आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सदस्य माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर ॲड. सुहास कांबळे, दयानंद पिंगळे, संतोष कळमकर, किशोर कांबळे , तानाजी साळुंखे उमेश नेवाळे , आकाश दळवी आदी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांनी संकलन केलेल्या “मानवी हक्काचा रक्षक” या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथिंच्या हस्ते झाले.