बार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुका क्रीडा संकुलासाठी ४३ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बार्शी तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी ४३ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या तालुका क्रीडा संकुलाकरीता प्रस्तावित वाढीव अनुदान मर्यादेच्या अधीन राहून व अंदाजपत्रक आराखड्यामधील शासन अनुदान मर्यादेबाहेरील उर्वरीत क्रीडा सुविधा संकुल समितीने स्वबळावर उभारण्याच्या अटीवर बार्शी तालुका क्रीडा संकुलाच्या रू. ४३३८.६३ लक्षचे अंदाजपत्रक व आराखड्यांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
तालुका क्रीडा संकुलात संकुलामध्ये ४०० मी धावनपथ, कटींग & लॅन्ड लेव्हलींग, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, जिम्नॅशियम हॉल व स्टोररूम, फुडन फ्लोरिंग, वॉकींग ट्रॅक, शुटींग रेंज, प्रसाधनगृह, मुले/मुली वसतीगृह, वॉचमेनकॅबींन, प्रेक्षक गॅलरी शॉपसह, वॉटर टैंक, विद्युतीकरण, अग्नीशामक व्यवस्था, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, लॅन्ड स्केपिंग इत्यादी कामे होणार आहेत.

प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. बार्शी तालुक्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा मोठा फायदा होणार आहे. बार्शी तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे. बार्शी तालुका क्रीडा संकुल बांधकाम करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वप्नाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शासनाने ४३ कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार राजाभाऊ राऊत यांनी यासाठी पाठपुरावा करत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठकाही घेतल्या होत्या. बार्शी तालुक्याच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button