आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने बार्शी तालुक्यातील विकास कामांसाठी ४० कोटी मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्याला यश,बार्शी तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी व पुलांची कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात ४० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील बार्शी पिंपळगाव (धस) ते जिल्हा हद्द रस्ता किमी प्रजिमा २७, कि.मी. ८/५०० व किमी १०/७०० मध्ये पूलाचे बांधकाम करणे पिंपळगाव(धस)गावाजवळ यासाठी ७ कोटी, श्रीपत पिंपरी ते रामा १४५ ला जोडणारा रस्ता ग्रामा २६२ किमी १/१०० मध्ये पूलाचे बांधकाम करणे श्रीपत पिंपरी गावाजवळ यासाठी ६ कोटी,काटेगाव चारे पाथरी पांगरी ते कारी ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा २९ किमी ३/९०० व ७/०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे चारे व पाथरी गावाजवळ यासाठी ४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
गेली अनेक पिंपळगाव धस,श्रीपतपिंपरी,पाथरी येथील पुल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांची मागणी होत होती.याबाबत आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे तेथील ग्रामस्थांनी मागणी केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरील पुलांची कामे मंजूर करण्यात आली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे.या पुलामुळे अनेक गाव वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये २३ कोटी निधी मंजूर झाला असून पुढील रस्त्यांची कामे होणार आहेत:- १) गोरमाळे नारी इंदापूर उपळे (दु) मुगशी (रा) रातंजन हिंगणी (रा) धामणगांव (दु) शेळगांव (रा) ते कोठाळी रस्ता प्रजिमा १०७ कि.मी. ०/०० ते ५/२०० मध्ये सुधारणा करणे गोरमाळे ते नारी यासाठी ३ कोटी ७५ लाख.२)माढा वैराग रास्ता रामा २०३ किमी १९/०० ते २१/०० मध्ये सुधारणा करणे मालवंडी ते सुर्डी यासाठी २ कोटी ५० लाख.३)गोरमाळे नारी इंदापूर उपळे (दु) मुगशी (रा) रातंजन हिंगणी (रा) धामणगांव (दु) शेळगांव (रा) ते कौठाळी रस्ता प्रजिमा १०७ कि.मी. ३४/०० ते ४२/३०० मध्ये सुधारणा करणे धामणगांव (दु) ते शेळगांव (रा) ते कौठाळी यासाठी ४ कोटी.४)रामा २०९ ते वालवड चारे बोरगाव (खु) बाभुळगांव रस्ता इजिमा २० किमी ०/०० ते १२/०० मध्ये सुधारणा करणे वालवड ते बाभुळगांव यासाठी ४ कोटी…५) आगळगाव उंबरगे भानसाळे खडकोणी कोरेगाव रस्ता प्रजिमा १२० किमी ०/०० ते १०/०० मध्ये सुधारणा करणे (आगळगाव ते खडकोणी) यासाठी ४ कोटी…६)वैराग हिंगणी मळेगांव चिखर्ड गोरमाळे पांगरी उक्कडगांव ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ३० किमी ०/०० ते ३/००, २३/१०० ते २३/६०० मध्ये सुधारणा करणे (वैराग ते हिंगणी) यासाठी २ कोटी…७)रा.मा. ६८ ते लक्ष्याचीवाडी उपळाई खांडवी श्रीपतपिंपरी गुळपोळी सुर्डी रस्ता प्रजिमा १०९ कि.मी. ६/६०० ते ७/२०० व १०/८०० ते १५/४०० मध्ये सुधारणा करणे(खांडवी ते श्रीपतपिंपरी) यासाठी २ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदरील कामे मंजूर करण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. सदरील कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानले.