बार्शीवनविभाग

बार्शी तालुक्यामध्ये सागवानाच्या लाकडासह वाहन जप्त : बार्शी वनविभागाची मोठी कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : 5 डिसेंबर 2023 रोजी, वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून गस्त करत असताना, मौजे कारी परिसरामध्ये एम डब्ल्यू आर 66 28 या वाहनाची तपासणी केली असता, सदरील वाहनांमध्ये विनापरवाना वृक्षतोड करून सागवानाचे 22 नग विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सदरील प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 नुसार कारवाई करून सदर वाहन चौकशीसाठी ताब्यात घेऊन वनक्षेत्र कार्यालय बार्शी या ठिकाणी जप्त करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई ही धैर्यशील पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, बाबा हाके सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली तर बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे, वन परिमंडळ अधिकारी इरफान काझी, जहांगीर खोंदे, वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी व इतर वन कर्मचारी यांच्या टीमने केली. सदरील प्रकरणी वाहनावर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास चालू असल्याचे बार्शी वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button