बार्शीमहाराष्ट्र

स्व शोभाताई सोपल स्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : 6 डिसेंबर रोजी स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल, पांगरी. येथे मोठ्या शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व प्रशालेतील विद्यार्थ्यासमवेत तसेच सर्व शिक्षक वृंद व सहकारी वर्ग यांनी मिळून मोठ्या आदराने व शांततेत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले.

ज्याप्रमाणे या महामानवाने अतोनात कष्ट करून आयुष्याची प्रत्येक पायरी यशस्वीपणे चढली व आपले आयुष्य एक अविस्मरणीय असे उदाहरण सर्व जगात पुढे व तरुणपिढी पुढे ठेवले, त्यांच्या याच संदेशाचा वारसा म्हणून अशा या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा मान प्रशालेतील उत्तम अभ्यास करून स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांना अभ्यासाचे व अपार कष्ट करण्याचा सल्ला प्रशालेचे संस्थापक श्री विनायक गरड सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षिका कु. काळे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी पार पडण्यास सर्व शिक्षक वृंद व सहकाऱ्यांनी आपले सहकार्य नोंदविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button