रिपब्लिकन पक्ष मजबूत करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क
दिल्ली / मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे. या पक्षात सर्व दलित कष्टकऱ्यांनी यावे.देशभरात सर्व राज्यात तळागाळात रिपब्लिकन पक्ष पोहोचविणार ; रिपब्लिकन पक्ष मजबूत करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न आपण साकार करणार असा निर्धार आज रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केला. नवी दिल्लीत सफदर जंग रोड येथील शासकीय निवासस्थानी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी आज सकाळी ना.रामदास आठवले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विविधतेने नटलेला भारत देश संविधानाने एकसंघ जोडला आहे. जात धर्म प्रांत पेक्षा देश महत्वाचा आहे.सर्व प्रथम आपण भारतीय आणि अंतिमतः आपण भारतीय आहोत असे सांगत प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. त्यानुसार देशाच्या एकतेसाठी आपण सदैव लढत राहू असा निर्धार ना.रामदास आठवले यांनी केला. शासनकर्ती जमात व्हा; सत्ते पर्यंत पोहोचले पाहिजे हा विचार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. राजकीय सत्तेत पुढे जाण्यासाठी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. त्यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे हीच खरी आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असे न.रामदास आठवले म्हणाले.
आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी दिनी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सकाळी 8 वाजता संसद भवन येथे पाहिले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत विनम्र अभिवादन केले. त्यानंतर नविदिल्लीत त्यांच्या सफदर जंग रोडवरील शासकीय निवासस्थानी उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. त्यानंतर दुपारी 3 वाजता मुंबईत चैत्यभूमी येथे ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब जाऊन आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्यास महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.