जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ट्रॉमा युनिटच्या ‘कॅज्युअलटी (तातडीची आरोग्य सेवा) लोकार्पण सोहळा व सुपरस्पेशालिटी ओ.पी.डी.’ इमारतीचा भूमिपूजन समारंभ…शुभहस्ते – मा.नामदार डॉ. तानाजीराव सावंत

0

शुक्रवारी बार्शीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत!

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थापित ख्यातनाम जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ४० कोटी रुपयांचा भव्य ट्रॉमा युनिट विभाग पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर आहे.

सदर प्रकल्प लोकसहभागातून उभारला जात आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल शेजारील प्रांगणात ट्रॉमा युनिटची चार मजली इमारत सर्व आधुनिक वैद्यकीय साधनसामुग्रीने रुग्णसेवेसाठी तयार आहे. यातील प्रत्येक विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. या ट्रॉमा युनिटमधील तळमजल्यात ‘कॅज्युअलटी (तातडीची आरोग्य सेवा)’ विभाग उभारण्यात आलेला असून यामध्ये १० बेड ऑक्सिजन सुविधासह तसेच तातडीने आवश्यकता भासल्यास मिनी ऑपरेशन थिएटर याशिवाय तातडीच्या आवश्यक सेवा सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.

या अत्याधुनिक कॅज्युअलटी विभागाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.नामदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते व बार्शी चे आमदार मा.श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत तसेच मा.श्री.दिनकरराव जगदाळे (सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी) व मा.श्री. राजेंद्र पवार (मेवानिवृत्त सचिव, पाठबंधारे विभाग) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.डॉ.बी.वाय. यादव अध्यक्ष, श्री. शि.शि.प्र.मंडळ, बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक- २७/१०/२०२३ रोजी शुक्रवार दुपारी ठीक ०३.०० वाजता संपन्न होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याबरोबर जगदाळे मामा हॉस्पिटल ट्रॉमा युनिट मधील सुपर स्पेशालिटी ओ.पी.डी. या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ देखील वरील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या