आरोग्यपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना 301 कोटी निधी मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांचे मानधन म्हणून 301 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना निधी अभावी हे दोन महिन्यांचे मानधन प्रलंबित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांचे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी आणि बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे घेतलेल्या मनुष्यबळाचे माहे मे २०२५ पर्यंतच्या मानधनासाठी सर्व जिल्हे, मनपा तथा इतर आरोग्य संस्थांना एकूण 301 कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वितररित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाकडून केंद्र शासनाकडे प्रलंबित निधी वितरित करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२५- २६ च्या पहिल्या हप्त्याचा केंद्र शासनाचा हिस्सा रु. ४९६.३८ कोटी प्राप्त झाला असून त्यास समरूप राज्य हिस्सा रू. ३०२.९९ कोटी वितरित करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button