छत्रपती ग्रुप व एसटी स्टँड चौक व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मसाला दुध व केळी वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : छत्रपती ग्रुप व एसटी स्टँड चौक व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मसाला दुध व केळी वाटप करण्यात आले.201 लिटर दुध व 21 कॅरेट केळी वाटप करण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष बजरंग पवार, छावा संघटनेचे अध्यक्ष निलेश (भैय्या) पवार, अतिश थोरात,जाफर शेख, सचिन मोरे प्रविण पवार, मेहबूब बागवान अमोल धावने, सौदागर वाघमारे,उमेश कानडे,अमर शिंदे महेश शिंदे, दादा मस्तुद, दिपक सावळे, शुभम कगंले, पारस शहा गणेश माने,वसंत टी, संजय माने आदींनी परिश्रम घेतले.