पत्रकारांनी न्यायीक परिभाषा समजून घेणे गरजेचे : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते
पत्रकारांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : न्यायालयीन विषयक बाबींचे वृत्तसंकलन करताना पत्रकारांनी न्यायीक परिभाषा समजूण घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आज पत्रकारांसाठी कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. यास पत्रकारांचा चांगला प्रतिसाद लाभला, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा एम. मोहिते यांनी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हा वकील संघाच्या सभागृहात आयोजित कायदेविषयक शिबीराच्या अध्यक्ष स्थानावरुन न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.डी. देव, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल चव्हाण, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. बाबासाहेब इंगळे, प्रमुख वक्ते जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, ॲड. ओममाहेश्वरी जाधव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव श्रीमती पी.पी. भारसाकडे – वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड.ओममाहेश्वरी जाधव यांनी न्यायालयीन प्रक्रिया व पत्रकारीता या विषयावर तर जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी सकारात्मक पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहूल चव्हाण यांनी पत्रकारीता यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी वकील संघाच्या सहसचिव ॲड. श्वेता यादव, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. एम. आर. वाघुंडे, ॲड. शैलेश देशमुख, ॲड. आश्विनी धन्नावत, ॲड. एस.बी. बोरकर, ॲड. महेश धन्नावत, ॲड. अरविंद मुरमे, ॲड. संजय काळवांडे, ॲड. सरिता गजरे यांच्यासह जिल्हा वकील संघाचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते. यावेळी सहायक लोक अभिरक्षक ॲड. यश लोसरवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सुत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. स्वप्निल खराबे यांनी केले. तर आभार सहायक लोक अभिरक्षक ॲड. मैजुद शेख यांनी केले.