सरपंच परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्षपदी बार्शीचे ॲड. विकास जाधव यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिर्डी या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती या वेळी सरपंच परिषदेच्या प्रदेश कार्यकारणीत अनेक फेरबदल करण्यात आले अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांच्याही निवडी करण्यात आल्या.
सरपंच परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक सरचिटणीस म्हणून ॲड विकास जाधव यांनी काम केले आहे. त्यांची दोन वेळा प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाली होती. या पदावर काम करत असताना अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झाली व ती यशस्वी झाली.
संपूर्ण राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व विकास जाधव यांनी जाळे निर्माण केले. त्यापूर्वी विकास जाधव यांनी सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी ही काम केले आहे. त्यावेळी राज्यातील सर्वात पहिला मेळावा सोलापूर जिल्ह्याचा विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता. तसेच बार्शी या ठिकाणीही पहिला सरपंचांचा मेळावा घेतला होता याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. अनेक दिवसापासून सरपंच परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या विकास जाधव यांना शिर्डी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व विश्वस्तांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
यावेळी या पदाला न्याय देण्याची भूमिका घेऊ असे आपल्या मनोगतात विकास जाधव यांनी सांगितले. आजपर्यंत अनेक संस्था संघटना किंवा संवैधानिक पदावर काम करत असताना प्रत्येक पदाला न्याय देण्याची भूमिका घेतली असल्यामुळे याही पदावर उत्तम कार्य करून संधीचे सोने करून असेही यावेळी सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांनीही ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा अनेक पदे घ्यावी अन्यथा पदे अडवून ठेवू नयेत असाही मंत्र उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी विकास जाधव यांच्यासह आजरा येथील राजीव पोतणीस यांची प्रदेश सरचिटणीस पदी तर आबासाहेब सोनवणे पाटील यांची प्रदेश कमिटी सदस्य पदी निवड झाली.
या बैठकीत राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांच्या जिल्हा समन्वयकांच्या व महिला पदाधिकाऱ्यांच्या ही निवडी जाहीर केल्या. या बैठकीत व्यासपीठावर सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, नूतन प्रदेश उपाध्यक्ष विकास जाधव, नूतन प्रदेश सरचिटणीस राजीव पोतणीस, प्रदेश विश्वस्त किसनराव जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय जगदाळे, महिला उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, सुषमा डेसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.