जगदाळे मामा हॉस्पिटलला मिळाले प्रतिष्ठेचे NABH मानांकन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कर्मवीर डॉ जगदाळे मामा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलला दिल्लीतील ‘नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल’ यांच्या वतीने देण्यात येणारे (एनएबीएच) मानांकन बार्शी सारख्या ग्रामीण भागातील जगदाळे मामा हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे.

विविध अद्यावत वैद्यकीय सोयी सुविधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग यामुळे जगदाळे मामा हॉस्पिटलला मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी मिळालेल्या एन.ए.बी.एच. मान्यतेबाबत बोलताना सांगितले की, हॉस्पिटलच्या विश्वासार्ह सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व किफायतशीर दरात योग्य उपचार यामुळे हॉस्पिटलने वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाचे हे यश असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. व्ही. जगताप यांनी एन.ए.बी.एच. च्या कार्यपद्धतीचा माहिती देताना रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळवून देणे, रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सर्व प्रकारच्या सरकारी-निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच रुग्णालयातील रेकॉर्डची देखील तपासणी करण्यात येते. असे विविध निकष ठरविण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयाचे व आरोग्य सेवेसाठीचे राष्ट्रीय अधिस्वीकृत मंडळ (एन ए बी एच) कार्यरत असल्याचे सांगितले. रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारची मान्यता एन.ए.बी.एच. कडून दिली जाते.
यांनी एन.ए.बी.एच. ची अधिस्वीकृती मिळवण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, जॉइंट सेक्रेटरी ए. पी. देबडवार, खजिनदार जे.सी. शितोळे व मॅनेजिंग कमिटी सदस्य यांचे मार्गदर्शन मिळाले, तसेच सर्व कन्सल्टंट डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, ऑफिस स्टाफ, स्वच्छता कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी मानांकनासाठी स्वतः झोकून देऊन काम केले आहे, त्यांचे मोठे योगदान असल्याचे जगताप यांनी सांगितले. जगदाळे मामा हॉस्पिटल हे गेल्या 48 वर्षापासून सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात उत्तम सेवा देत आहे. 1975 मध्ये “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” या उद्देशाने स्थापन झालेले हे चार खाटांचे हॉस्पिटल आज 300 खाटांचे झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या