विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बार्शी भेटीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अशोक स्तंभ व ग्रंथालयाची विविध सामाजिक संघटनेची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मे 1924 च्या ऐतिहासिक बार्शी तालुका भेटीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्य करणारे सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीने बार्शी नगर परिषदचे मुख्याधिकारी साहेब यांना भीमनगर चौक बार्शी येथे अशोकस्तंभ व ग्रंथालय अश्या स्वरुपाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी, संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष आनंद काशीद , माजी नगरसेवक आण्णासाहेब लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विवेक गजशीव, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष वसीम भाई पठाण, कामगार नेते अजित दादा कांबळे, इब्राहिम शेख, वंचित बहुजन आघाडीचे शोयब भाई सय्यद,शरद बनसोडे,रुपेश बंगाळे, आनंद चांदणे,आशिष शिंदे, सामाजिक कार्यकर्ता पवन गायकवाड,अविनाश भालशंकर वंचित बहुजन आघाडी लंकेश्वर बहुजन क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा संयोजक तानाजीराव बोकेफोडे, बामसेफ सोलापूर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे सर,भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रणजीत सोनवणे आदी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.