बार्टी संस्था ‘आयएसओ’ ने सन्मानित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेला नुकतेच ‘आयएसओ’ आंतरराष्ट्रीय मानक प्रमाणपत्र मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्यावतीने कार्यरत असलेल्या पॅरामाऊट गुणवत्ता प्रमाणपत्र या संस्थेने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली 900/2015 अंतर्गत प्रणालीचा विकास मुल्यांकन तपासणी, कागदपत्रे पडताळणी, अंतर्गत विश्लेषण, पुनर्रचना विकास व त्यांला लागणारे कागदपत्रे साहित्य प्रशिक्षण कौशल्य विकास व्यवस्थापन यांची पडताळणी केली. आणि बार्टी संस्थेच्या कामकाजात आधुनिकतेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याबदल आंतरराष्ट्रीय मानक संस्थेने बार्टी संस्थेला आयएसओ ने सन्मानित केले.

बार्टी हि संस्था अनुसुचित जातीच्या घटकांकरिता प्रशिक्षण व संशोधनाचे कार्य करत असते तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करते बार्टी या संस्थेची स्थापना 22 डिसेंबर 1978 रोजी झाली असून या संस्थेला 2008 मध्ये स्वायत्त संस्था म्हणून शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

या संस्थेने अनेक जातीचे संशोधन करून राज्य शासनास पाठवले आहे. कौशल्य विकास यांचे प्रशिक्षण दिले युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे तसेच आयबीपीएस द्ववारे प्रशिक्षण देऊन प्रशासनात पाठविले संशोधन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवती (बीएएनआरएफ), एम. फिल व पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली प्रकाशन व प्रसिद्धी विभागाद्वारे घर घर संविधान ही मोहीम राबविण्यात येत आहे.

‘भीमराव ते बाबासाहेब’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या मान्यवर व महापुरुषांचा इतिहासावर वेबमालिकेची निर्मिती करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या 13 मांतग परिषदेचे संकलन तसेच सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे यांचे संशोधन करण्यात येत आहे. बार्टी संस्थेला आयएसओ मानांकन मिळाल्याबदल बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी बार्टीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

आयएसओ मानांकन बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी मा महासंचालक सुनिल वारे यांना सुपूर्द केले. यावेळी बार्टीचे सर्व विभागप्रमुख हजर होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या