सुयशचे तब्बल दहा विद्यार्थी मंथन परीक्षेच्या राज्याच्या गुणवत्ता यादीत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : स्कॉलरशिपच्या तयारीसाठी याच धरतीवर जी परीक्षा आयोजित केली जाते ती म्हणजेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षा. या परीक्षेमध्ये सुयशचे प्रत्येक इयत्तेमधून विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. यामध्ये इयत्ता पहिली– सुरश्री सत्यदेव अडसूळ राज्यात 150 पैकी 138 गुण मिळवून पहिली आलेली आहे. इयत्ता दुसरी यश बलदोटा राज्यात सातवा आलेला आहे.

इयत्ता तिसरी– स्वरा शरद इतापे ३०० पैकी 286 गुण मिळवून राज्यात सातवी आलेली आहे.

इयत्ता चौथी– हर्षवर्धन विश्वास लोकरे 300 पैकी 284 गुण मिळवून राज्यात सातवा. इयत्ता पाचवी उर्वीच सचिन दराडे तीनशे पैकी 294 गुण मिळून राज्यात तिसरा.अर्णव तुकाराम कालवे 300 पैकी 292 गुण मिळवून राज्यात चौथा. अभिरुप शशिकांत पाटील 300 पैकी 286 गुण मिळवून राज्यात सातवा. इयत्ता सहावी मधून शौर्य सुभाष यावलकर 300 पैकी 280 गुण मिळून राज्यात सहावा. श्रेयश महेश काशीद 300 पैकी 286 गुण मिळवून राज्यात सहावा. इयत्ता आठवी– मधून प्रथमेश तानाजी पायघन 300 पैकी 276 गुण मिळवून राज्यात तिसरा.

तसेच इतर अनेक विद्यार्थी देखील उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरातून त्यांच्या इयत्तेच्या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते तसेच संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे साहेब संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे मॅडम प्रशालेचे मुख्याध्यापक सागर मंडलिक सर यांचेही प्रोत्साहन पर बहुमोल मार्गदर्शन वेळोवेळी या विद्यार्थ्यांना लाभले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या