रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून पंचवटीत विशेष स्वच्छता मोहीम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक : महापालिकेतर्फे पंचवटीत श्रीराम रथोत्सव मिरवणूक मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे उपस्थित होते. रथोत्सव मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर या मार्गावरील सगळा कचरा संकलीत करुन तात्काळ घंटागाडी मार्फत उचलून घेण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेत श्री काळाराम मंदिर, नागचौक, कात्यामारुती चौक, गणेशवाडी मार्गे, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, रामकुंड आदी परिसरातील श्रीराम रथ मिरवणूक मार्गावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली.
सदर स्वच्छता मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उदय वसावे, दीपक चव्हाण, स्वच्छता निरीक्षक किरण मारू, मुकादम बाळु पवार, चंद्रशेखर साबळे, दिनेश सोलंकी, नरेश नागपुरे, निलेश गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे, संजय जमधाडे आणि ७० स्वच्छता कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे, अजिंक्य राईकर यांच्यासह एकूण ६५ कर्मचा-यांनी पंचवटीत स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. गोदाघाटसह संपूर्ण पंचवटी परिसरात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवली जाते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या