मनपाच्या १९ कर्मचा-यांचा सेवापूर्ती निमित्त प्रशासनामार्फत सत्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक : महानगरपालिकेच्या विविध विभागातील १९ कर्मचारी ३१ मार्च २०२३ अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील अभिलेख कक्ष सभागृहात त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ झाला.

काही कर्मचाऱ्यांच्या आप्तस्वकीयांनी भावना व्यक्त केल्या. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. मा. प्रदीप चौधरी यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करून निवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवृत्त कमचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधी विभागातील सहाय्यक अधिक्षक प्रमोद लिमजे, सहाय्यक लेखापरीक्षक राजेंद्र घुले, स्लम पूर्व विभागातील लिपीक यूसुफखान पठाण, मिळकत विभागातील सुपरवायझर रविंद्र खरे, शिक्षण विभागातील वाहनचालक शेखर हजारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मिनाक्षी भोला, कुष्ठरोग तंत्रज्ञ तानाजी गोसावी, फायरमन नाना गांगुर्डे, हेमंत कुलकर्णी, वॉर्ड बॉय संजय मंडलीक, माळी बामण खुमसिंग, पाईपलाईन फिटर बाळू मोहिते, पंचवटी विभागातील सफाई कामगार दिपक गायकवाड, अनिल साळवे, राजू रोकडे नवीन नाशिक विभागातील योगेश तेजाळे, पूर्व विभागातील मंगेश लासुरे, सातपूर विभागातील डायाबेन डायमा, दीना गोहित आदी कर्मचारी निवृत्त झाले.

सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचा-यांना कामगार कल्याण निधीतून प्रत्येकी १० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. कामगार कल्याण विभागातील महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, आरती मारु, साहिल बोडके आदी कर्मचा-यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या