जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक : महानगरपालिकेचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण विभाग यांच्यातर्फे आज दिनांक 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून सकाळी 9.30 वाजता रॅली काढण्यात आली. क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यांच्या हस्ते क्षयरोगाचे जनक रॉबर्ट कॉक्स ज्यांनी क्षयरोग जंतूंचा शोध लावला त्यांचे प्रतिमा पूजन तसेच धनवंतरी पूजन करण्यात येऊन हवेमध्ये होय! आपण टीबी संपवू शकतो घोषवाक्य असलेले बलून सोडून तसेच रॅलीला हिरवा कंदील दाखवून रॅलीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, दि गेटवे हॉटेलचे जनरल मॅनेजर ख्रिस्तोफर वेगास , एच आर मॅनेजर सीमा लेले, दिनेश देशमुख , डॉ विनोद पावसकर, डॉ योगेश कोशिरे, डॉ चारुदत्त जगताप डॉ शामल परदेशी, डॉ स्वाती भेंडाळे, भारतकुमार झांबरे महेंद्र खैरनार अजय जाधव, भगवान भगत, भालचंद्र लहवारे, तुषार जावळे, संदीप गवळी ,आणि सिडको व मोरवाडी मनपा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत गेटवे हॉटेल , नाशिक यांच्यावतीने २५ क्षरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार किट चे वाटप देखील डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक यांचे हस्ते करण्यात आले. क्षयरोग विभागामार्फत जनजागृतीसाठी छापण्यात आलेल्या माहिती पत्रिकांचे प्रकाशन देखील याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त यांनी क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करायला हवे तसेच ज्या क्षयरुणांना उपचार सुरू आहेत त्यांनी शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व मोफत सुविधांचा लाभ घेऊन पूर्ण उपचार घेऊन बरे व्हावे असे मनोगत व्यक्त केले.
डॉ. कल्पना कुटे, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा नाशिक यांनी क्षयरोग मुक्ती साठी सर्वांना शपथ दिली.
समाजकार्य महाविद्यालय, नाशिक च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून समाजात असणारा क्षरोगाविषयी गैरसमज, क्षयरोग पूर्ण पणे बरा होतो व त्यासाठी शासन व नाशिक महापालिका स्तरावर दिल्या जाणाऱ्या सर्व मोफत सुविधांचा पथनात्याद्वारे संदेश दिला. रॅलीमध्ये डॉट्स सामाजिक संस्था कर्मचारी, सिडको कॉलेज, धन्वंतरी कॉलेज, नर्सिंग कॉलेज ३५० विद्यार्थी शिक्षकवृंद, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रम विभागाचे कर्मचारी सहभागी झाले.
क्षयरोग दिन व सप्ताहाच्या निमित्ताने ऑटो मायकिंग, शाळा/महाविद्यालयात कार्यक्रम , जनजागृतीपर पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या