ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : मराठी चित्रसृष्टीत मोठे योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते आणि शिक्षक भालचंद्र कुलकर्णी (वय ८८) यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी 300 वर चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. मराठी चित्रपट सृष्टीत सहायक भूमिकेने भालचंद्र कुलकर्णी यांनी छाप सोडली होती. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी त्यांची सकाळी सहा वाजता निधन झाले. गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, मर्दानी (1983), मासूम (1996), झुंज तुझी माझी (1992), हळद रुसली कुंकू हसलं (1991), माहेरची साडी (1991) यासह अनेक चित्रपटांतून भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या. सहायक भूमिकेसाठी भालचंद्र कुलकर्णी यांना ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या