संधी मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात महिला नावलौकिक कमावते : उज्वलाताई सोपल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : स्त्री ही माता आहे, भगिनी आहे. कुटुंबाचा आधार आहे हा आधार सर्वांनी मिळून जपणे गरजेचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने नावलौकिक मिळवले आहे, बार्शी पंचक्रोशी येथील उद्योग व्यवसायातील महिलांचा सन्मान करायला मिळणे हे भाग्याची गोष्ट आहे, कुटुंबीयांचा सपोर्ट व संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहते, असे प्रतिपादन उज्वलाताई सोपल यांनी व्यक्त केले. बार्शी शहरातील हॉटेल रामकृष्ण येथे उद्योग व व्यवसायात नावलौकिक कमावलेल्या २० महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘भाग्यकांता सामाजिक प्रतिष्ठान’च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उद्योग वय वर्षे ४ ते ६५ दरम्यान असलेल्या बालमहिला ते ज्येष्ठ महिला यांना सन्मानित करण्यात आले.आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमलताई माळी यांचे शिक्षण दुसरी पास असून यांच्या ६०० पेक्षा जास्त कविता प्रकाशित झाल्या असून त्यांनी त्यांनी कवितेच्या माध्यमातून कार्यक्रमांमध्ये रंगत वाढवली. शिक्षण नसतानाही शेकडो कविता रुचून मुखपाठ असणाऱ्या विमलताईला म्हणूनच आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखले जाते. आज पर्यंत पुरस्कार खूप मिळाले पण माहेरच्या लोकांकडून मिळालेला हा पहिलाच पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन विमलताई माळी यांनी केले. भाग्यकांता प्रतिष्ठानच्यावतीने २०२२-२३ चा जीवनगौरव पुरस्कार कविताताई नेने यांना देण्यात आला. उद्योग व व्यवसायात योगदान देणाऱ्या बार्शी पंचक्रोशीतील मायरा जैन, सुनिता गाडेकर, खांडवीच्या सुधामती बारंगुळे, शोभा पल्लोड, गुंजन व मीना जैन, सुगंधा आगवणे, नीलिमा रायचूरकर, रश्मी पूनमिया, शितल भंडारी, ज्योती जावळे,प्रमिला मठपती,अंकिता चांडक,दिपाली झालटे, कोमल मंगरुळे, मीनाक्षी यादव, शहिदा बोहरी, उल्का डोंबे, स्नेहल पाटील, नीलम अग्रवाल यांचा महिला दिनानिमित्त विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील उज्वलाताई सोपल, कल्पनाताई बारबोले, प्रतिभाताई चव्हाण व विमलताई माळी यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला भाग्यकांताचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर चव्हाण, मल्टीकोरच्या संचालिका विमल इंगोले, सचिव विजय शिखरे, मल्टीकोरचे संचालक रोहन नलवडे, डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य सूर्यकांत वायकर, अभिनेते अभय चव्हाण, मीना शिखरे, विभाताई नलावडे, विद्या चव्हाण, उर्मीला वखारिया, अनुराग राजगुरू हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना मल्टीकोरचे संचालक अमित इंगोले यांनी केली. तर सूत्रसंचालन धर्माधिकारी तर आभार प्रदर्शन गणेश शिंदे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या