सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी आयोजित “महिला क्रीडा स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ०८ मार्च रोजी” महिलादिन “निमित्त सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी, सोलापूर यांच्या वतीने सर्व महिलां करीता व अकॅडमी च्या सर्व महिला पालकांकरिता ” महिला क्रीडा स्पर्धा २०२३ ” चे आयोजन सोलापूर येथील शिवस्मारक क्रीडांगण नवीपेठ या ठिकाणी करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन सोलापूर महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र चे प्राचार्य डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते भारतमातेचे व मैदानाचे पूजन करून ,हवेत फुगे सोडून करण्यात आले . यावेळी सौ.विद्या वरडुळे – खेडकर (उपशिक्षीका , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , केगाव ), श्रुती माने , सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी चे संस्थापक चन्नेश इंडी ,योगेश इंडी सह आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटन नंतर सर्व प्रमुख मान्यवरांचे अकॅडमी च्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.उदघाटन मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे डॉ.वैशाली कडूकर यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व महिला स्पर्धकांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन खेळातील महत्व पटवून देत ” खेलेगा इंडिया तो आगे बडेगा इंडिया ” असे घोस वाक्य देऊन उपस्थित महिलांची स्फूर्ती वाढवली व त्यांना प्रोत्साहन देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शालेय जीवन व कॉलेज जीवनानंतर बरेच महिलांना खेळाचा आनंद लुटता येत नाही ना कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळत नाही.महिलादिनी त्यांना त्यांचे शालेय जीवनातील व महाविद्यालयिन जीवनातील आनंद पुनःश्च मिळावा व त्यांच्यातील खेळाला ,कलागुणांना व खेळातील कौशल्याला वाव मिळावा या हेतूने सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी दरवर्षी महिला दिन रोजी महिला क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.सदर स्पर्धेत दरवर्षी अनेक महिला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आनंदाने आपला महिलादिन या कार्यक्रमास उपस्थिती लावून साजरा करतात. वर्षभर रोजचा सर्व काम सांभाळून धखाधखीच्या जीवनात इच्छा असूनही सहभागी होता येत नाही अशा सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मनसोक्त आनंद मिळावा , त्यांना स्फूर्ती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांना स्पर्धेचे व्यासपीठ निर्माण करून सुवर्ण स्पोर्टस् अकॅडमी त्यांच्या सहभागी होते.या स्पर्धेत ५० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवत स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला .कोन रेस ( शर्यत ),शटल रन ,म्युजिक बॉक्स या खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.