नई जिंदगी सुमैय्या नगर येथे डॉ. अरमान पटेल यांच्या ग्लोबल हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिरात ५५० रुग्णाची तपासणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जागतिक महिला दिनांनिमित्त सुमैय्या नगर, नई जिंदगी येथील डॉ. अरमान पटेल यांच्या ग्लोबल हेल्थ केअर फाउंडेशन सोलापुर, डॉ अरमान पटेल मित्रपरिवार च्या वतीने मोफत आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते मा. नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षेतेखाली डॉ. गफूर जुनैदी, माजी नगरसेवक N.K. क्षीरसागर, मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, शकील शेख (बिल्डर) सैफन पटेल, अश्फाक शेख, सादिक अत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या शिबिरात ५५० रुग्णाची तपासणी करून गरजुना मोफत औषधे देण्यात आले.या शिबिरामध्ये डॉ. अ. हफीज अ. गफूर जुनेदी, डॉ. जुवेरिया अ. हफीज जुनेदी, डॉ. शेख खदिजा तबशीर कलिमोद्दीन, डॉ. तबस्सुम शेख, संयोजक डॉ. अरमान पटेल यांनी रुग्णाचे मधुमेह, रक्तदाब, नेत्ररोग, गरजेनुसार ईसीजी, नसांची तपासणी, महिलांच्या प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, मासिक पाळी, गर्भाशय पिशवीच्या समस्या, गरोदर महिलांचे तपासणी, मुलींच्या समस्या व इतर स्त्रीरोग समस्या, लहान मुलांचे आजार एलर्जी, डायरिया, काविळ, न्यूमोनिया, बालदमा, वारंवार सर्दी, खोकला, ताप, झटके आदि समस्या, या सर्व रोगाचे तपासणी करण्यात आले. या शिबिरास नई जिंदगी भागातील गरजु नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.तसेच हे शिबीर १२ मार्च २०२३ लाही आयोजित केला त्या शिबिराला ही नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दयावा असे आवाहन डॉ अरमान पटेल यांनी केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या